Posts

खराखुरा पँथर!

Image
दिनांक:- २५/१२/२०२१ रोजी प्रकाशित, आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री (राज्य) रामदास आठवलेंचा वाढदिवस! त्यांच्या वाढदिवसा निमित्त या अवलिया विषयी दोन शब्द!! रामदास आठवलें सारख्या नेत्याला आपल्यापैकी बरेच जण सिरियसली घेत नाहीत,त्यांची ही इमेज किंवा विदूषकी प्रतिमा तयार होण्यामागे त्यांचीच वागणूक कारणीभूत आहे मग ते कोणत्याही राजकीय/अराजकीय मुद्द्यांवर चित्रविचित्र कमेंट्स करणे असो,त्यांचा विचित्र ड्रेसिंग सेन्स असो किंवा आपल्या जगप्रसिद्ध कविता करणे असो. पण कोणी काहीही म्हणो पण मला हा माणूस जाम आवडतो आज यांना राजकीय जीवनात सार काही नशिबाने मिळत आहे असे जरी अनेकांना वाटत असले तरी या माणसाने एके काळी दलित चळवळीत खूप खस्ता खाल्ल्या आहेत, असो हा वेगळा मुद्दा आहे पण कधी कधी असे विनोदी माणसं सुद्धा जाणते अजाणतेपणी भारी काम करतात. मागे एका छोटेखानी कार्यक्रमात किंवा अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत त्यांनी कॊरोना या जागतिक महामारीच्या विरोधात सहजपणे गो कॊरोना,कॊरोना गो अशी घोषणा दिली.(या वेळेस भारतात सर्वत्र लॉक डाउन झालेले नव्हते) लोकांनी या वेळेस त्यांची मोठ्या प्रमाणावर टिंगलटवाळी केल

नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी करण्यात आलेली नियुक्ती काँग्रेसला राज्यात पुन्हा 'अच्छे दीन' आणेल?

Image
दिनांक-१२/०२/२०२१ रोजी प्रकाशित, नाना पटोले हे व्यक्तिमत्त्व आरंभी पासूनच थोडेसे आक्रस्ताळे,बेभरवशाचे व अति आक्रमक राहिले आहे, त्यांचा प्रवास हा कोणत्या एका पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला नाहीये! त्यांचा हा स्वभाव कदाचित त्यांना वैयक्तिक पातळीवरील राजकारणात राजकीदृष्ट्या सोयीचा असेलही परंतु एका पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी हा स्वभाव घातक ठरू शकतो!त्यांनी त्यांच्या अति आक्रमकतेला आवर घालायला हवी. काँग्रेस पक्षात कोणत्याही महत्त्वाच्या पदावर जाण्यासाठी गांधी परिवाराची तुमच्यावर खास मर्जी असणे ही सर्वात महत्वाची बाब आहे, त्यासाठी तुम्ही वाट्टेल तो खुळेपणा केला तरी हरकत नाही, दुसरी गोष्ट म्हणजे नाना पटोले हे लोकांसमोर प्रकाशझोतात आले ते २०१७ मध्ये जेव्हा त्यांनी आपल्या भाजपा खासदार पदाचा राजीनामा दिला होता. तद्नंतर २०१९ मध्ये ते नागपूर लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांच्या विरोधात उभे राहून निवडणूक हरले, या निवडणुकीदरम्यान पराभूत झाल्यास राजकारणाला रामराम ठोकेल अशी वल्गना सुद्धा नाना पटोलेंकडून करण्यात आली होती पण नंतर सोयीस्कर रित्या ती विसरली गेली पुढे नाना पटोले २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेव

Was Gandhi really a Mahatma?

Image
दिनांक - ३०/०१/२०२१ रोजी प्रकाशित, गांधी खरचं महात्मा होते? ३० जानेवारी १९४८ रोजी झालेल्या गांधी वधाचा दोषी पंडित नथुराम गोडसे यांच्या समर्थन करणारे किंवा त्यांना शिव्या देणारे अनेक जण आपल्याला दिसतील पण याबाबतीत गांधीवधाच्या निमित्ताने माझे वैयक्तिक विचार मी येथे मांडतो! काहीजणांना हा लेख गांधी हत्येचे समर्थन करणारा वाटेल पण इथे कोठेही त्यांच्या हत्येचं समर्थन नाहीये! आयुष्यभर स्वतः चे विचार, स्वतः चे नियम, स्वतः ची तत्वे हे जपण्याच्या नादात या अखंड हिंदू राष्ट्राची अधोगती यांच्याच चरख्याच्या सुताने विणली, गांधी कोणाला कितीही अहिंसेचे पुरस्कर्ते वाटो, पण सर्वात मोठा नरसंहार हा याच ढोंगी दुरात्म्यामुळे घडला, अखंड देश तीन भागात विभागला गेला, मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यात यांचा हात कोणीही धरू शकणार नाही मग् ते खिलाफत चळवळीला पाठिंबा देणे असो अथवा फाळणीच्या मागणीला समर्थन असो! हा निर्णय घेताना मी फार व्यथित झालो होतो हे वाक्य म्हणून हजारो लोकांचा नरसंहार थांबला का? सध्य स्थितीतील पाकिस्तानातून आपल्या वडिलोपार्जित संपत्ती,जमीन, घर-दारं एका क्षणात सोडून लोकांना जीव वाचवून पळून यावे लागले!

सेनेचे भविष्य?

Image
दिनांक -१३/१०/२०२० रोजी प्रकाशित, कोणत्याही राज्याचा/प्रदेशाचा विकास मुख्यत्वे भारतासारख्या विकसनशील देशात हा एका ५ वर्षांच्या काळात होणे फार कठीण असते,पण २०१४-२०१९ या आपल्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक चांगल्या योजना राज्याला दिल्या, यात प्रामुख्याने जलयुक्त शिवार सारखी योजना असो, राज्यातल्या कारखानदारी संदर्भातील त्यांचा पाठपुरावा असो विविध उद्योग-व्यवसायांना चालना असो मुंबई मेट्रो,पुणे मेट्रो,नागपूर मेट्रो,मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प असो इत्यादी व अनेक योजनांना त्यांनी पाठबळ दिले व यामुळे राज्य निश्चित विकासाच्या मार्गावर आरूढ झाले ही गोष्ट कोणी नाकारणार नाही. राहता राहिला प्रश्न सेनेचा तर त्यांनी सरळ-सरळ सत्तेच्या मोहापायीं लोकांनी एकत्रित निवडून दिलेल्या युतीला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत सरकार स्थापन केले व यानंतर केवळ आणि केवळ जुन्या सरकारच्या योजनांना स्थगिती लावण्याचे काम केले, उद्धव ठाकरे सरकार हे केवळ राजकीय सुडापोटी राजकारण करत आहे हे याच गोष्टींनी सिद्ध होते की,जलयुक्त शिवार अभियान असो, मुंबई-पुणे हायपर लूप योजना असो या व अशा ४६ योजना ज्या मागी

तो पुन्हा येईल...!!!

Image
दिनांक २२/०७/२०२० रोजी प्रकाशित, #तो_पुन्हा_येईल.....!! #Birthday_Spl_ #22july2020 मी पुन्हा येईन, ही केवळ घोषणाचं नव्हती, तर कर्तव्यपूर्ती मधून आलेला आत्मविश्वास होता. कर्मठ कार्याचा हुंकार होता, सर्वसामान्य जनतेच्या मतांच्या कौलाचा असलेला विश्वास होता. जनतेनं त्यावर शिक्कमोर्तब ही केलं होतं हाचं मुख्यमंत्री पुन्हा हवाय असा कौल ही दिला होता. पण, दगाबाजीची परंपरा असणाऱ्यांच्या बाजूने आपले सोबती जातील असं कधीचं वाटलं नव्हतं, भाजपा प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात १२३ आमदार निवडून आले होते. तर पूर्ण ५ वर्ष सत्तेत मुख्यमंत्री असताना १०५ आमदार निवडून आले आहेत. दोन्ही वेळा १०० पारं संख्येत आमदार निवडून आणणे एकदाही  "कथित चाणक्य" म्हणवणाऱ्या नेत्याला जमलं नाही. अर्ध शतकाहून अधिक राजकीय कारकीर्द असणारे अजुन भावी पंतप्रधान अशी बिरुदावली मिरवतात, तर आज केवळ पन्नाशीतल्या फडणवीसांना भावी पंतप्रधान म्हणून पहिलं जात आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्राने जाती-जातीत भांडण लावणारे, प्रचंड भ्रष्टाचाराच्या जोरावर कार्यकर्ते मोठे करणारे,सहकारी संस्था, कारख

अजित पवार आणि मुख्यमंत्री पदं

Image
दिनांक:-५/०७/२०२० रोजी प्रकाशित, शरद पवारांची जशी पंतप्रधानपदाची सुप्त इच्छा जगापासून लपून राहिलेली नाही तशी अजित दादांच्या मनात मुख्यमंत्री पदाची लालसा असण्यास काहीही हरकत नाही, परंतू माझ्या मतानुसार शरद पवार जिवंत असे पर्येंत तरी ते दादांना मुख्यमंत्री होऊ देतील असं वाटतं नाही यामागे अनेक कारणे देखील आहेत अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी कितीही लायक व्यक्ती असली तरी शरद पवारांसारखी कुटील डाव खेळणारी व्यक्ती जीवंत असे पर्येंत ते अजित पवार यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत, त्यांना जर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे असते तर २००४ सालीच केले असते नाहीतर पक्षातील सर्व आमदारांची इच्छा असून देखील २००९ साली त्यांनी दादांना मुख्यमंत्री केले नाही, ते आजही मुख्यमंत्रीपदी स्वतःची कन्या सुप्रिया सुळे यांना पाहतात त्यामुळे लायकी असताना देखील अजित पवारांचे मुख्यमंत्री पदी बसणे शक्य नाही,स्वतःचा पक्षावर वचक राहण्यासाठी कोणत्या व्यक्तीला किती महत्व द्यायचे,कोणाला किती वर आणायचे आणि कोणाला कसे नियंत्रणात ठेवायचे हे शरद पवार चांगलेच जाणतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील एकेकाळी पश्चिम मह

सोनू सूद:भाजपचा एजंट??

Image
दिनांक:-०७/०६/२०२० रोजी प्रकाशित , आज एका दरबारी कार्यकारी संपादकांनी त्या सामाजिक भान जपणाऱ्या अन् हजारो कामगारांच्या मदतीला धावणाऱ्या अभिनेते,निर्माते असलेल्या सोनू सूद यांच्यावर टीका केली आहे.म्हणतात काय तर "सोनू सूद हा भाजपाचा एजंट आहे, त्याला पुढे करून भाजपाने परप्रांतीय मतांचे राजकारण केले." मुळात हे आरोप ऐकून सोनू सूद यांच्या मनाला काय वेदना झाल्या असतील ! केवळ चिखलफेक राजकारणापोटी सोनू यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. त्या दरबारी संपादकांच्या बुद्धीची कीव येते. ज्यावेळी राज्य सरकार आणि त्यांचे नेते घरात बसले होते. रस्त्यावर लहान मुलं, महिला, हजारो मजूर चालत होते, त्यांची कोणतीही व्यवस्था केली जात नव्हती त्यावेळी सोनू सूद नावाचा अभिनेता स्वतःच्या पैशातून परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्याचे काम करत होता. कोणाला जेवण पाहिजे का?कोणाला धान्य,फळं,फूड पॅकेट्स पाहिजेत का? त्यांना ते ते देण्याचं काम सोनू सूद यांनी केलं. पण ठीक आहे, चला. तुम्ही यातून एक सिद्ध केलं, सामाजिक काम करणारा कोणताही माणूस भाजपाचाच एजंट असू शकतो. कारण बाकी असे काम