सोनू सूद:भाजपचा एजंट??
दिनांक:-०७/०६/२०२० रोजी प्रकाशित,
आज एका दरबारी कार्यकारी संपादकांनी त्या सामाजिक भान जपणाऱ्या अन् हजारो कामगारांच्या मदतीला धावणाऱ्या अभिनेते,निर्माते असलेल्या सोनू सूद यांच्यावर टीका केली आहे.म्हणतात काय तर "सोनू सूद हा भाजपाचा एजंट आहे, त्याला पुढे करून भाजपाने परप्रांतीय मतांचे राजकारण केले." मुळात हे आरोप ऐकून सोनू सूद यांच्या मनाला काय वेदना झाल्या असतील ! केवळ चिखलफेक राजकारणापोटी सोनू यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. त्या दरबारी संपादकांच्या बुद्धीची कीव येते.
ज्यावेळी राज्य सरकार आणि त्यांचे नेते घरात बसले होते. रस्त्यावर लहान मुलं, महिला, हजारो मजूर चालत होते, त्यांची कोणतीही व्यवस्था केली जात नव्हती त्यावेळी सोनू सूद नावाचा अभिनेता स्वतःच्या पैशातून परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्याचे काम करत होता. कोणाला जेवण पाहिजे का?कोणाला धान्य,फळं,फूड पॅकेट्स पाहिजेत का? त्यांना ते ते देण्याचं काम सोनू सूद यांनी केलं.
पण ठीक आहे, चला. तुम्ही यातून एक सिद्ध केलं, सामाजिक काम करणारा कोणताही माणूस भाजपाचाच एजंट असू शकतो. कारण बाकी असे काम करणाऱ्या कुणाची पात्रता असूच शकत नाही.
(हे संपादकांचेच म्हणणे आहे, असे सिद्ध होते.)
गुलामी करावी, किती करावी, अन कोणत्या काळात करावी याचं भान असलं पाहिजे, आपल्या धडावर आपलं डोकं असलं की असं घडत नाही. असो. तुमच्याकडून चांगली अपेक्षा करणे गैर आहे. हे तुम्ही वारंवार सिद्ध केलं.
तुम्ही, गुलामी करत रहा, उचला सतरंज्या...
सोनू सूद हे भाजपाचे एजंट असतील तर अभिमानच नाही तर गर्व आहे.
✌️💪
-ऋषी भूमकर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
Comments
Post a Comment