नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी करण्यात आलेली नियुक्ती काँग्रेसला राज्यात पुन्हा 'अच्छे दीन' आणेल?
दिनांक-१२/०२/२०२१ रोजी प्रकाशित,
नाना पटोले हे व्यक्तिमत्त्व आरंभी पासूनच थोडेसे आक्रस्ताळे,बेभरवशाचे व अति आक्रमक राहिले आहे, त्यांचा प्रवास हा कोणत्या एका पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला नाहीये! त्यांचा हा स्वभाव कदाचित त्यांना वैयक्तिक पातळीवरील राजकारणात राजकीदृष्ट्या सोयीचा असेलही परंतु एका पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी हा स्वभाव घातक ठरू शकतो!त्यांनी त्यांच्या अति आक्रमकतेला आवर घालायला हवी.
काँग्रेस पक्षात कोणत्याही महत्त्वाच्या पदावर जाण्यासाठी गांधी परिवाराची तुमच्यावर खास मर्जी असणे ही सर्वात महत्वाची बाब आहे, त्यासाठी तुम्ही वाट्टेल तो खुळेपणा केला तरी हरकत नाही, दुसरी गोष्ट म्हणजे नाना पटोले हे लोकांसमोर प्रकाशझोतात आले ते २०१७ मध्ये जेव्हा त्यांनी आपल्या भाजपा खासदार पदाचा राजीनामा दिला होता. तद्नंतर २०१९ मध्ये ते नागपूर लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांच्या विरोधात उभे राहून निवडणूक हरले, या निवडणुकीदरम्यान पराभूत झाल्यास राजकारणाला रामराम ठोकेल अशी वल्गना सुद्धा नाना पटोलेंकडून करण्यात आली होती पण नंतर सोयीस्कर रित्या ती विसरली गेली पुढे नाना पटोले २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले व महाविकास आघाडी सरकार मध्ये आश्चर्यकारकरित्या नानांच्या वाटेला सभापतीपद आले.( आश्चर्य एवढ्याच साठी की या पदासाठी पृथ्वीराज चव्हाणांच नाव चर्चेत होत पण ऐनवेळेस शरद पवारांचा पृथ्वीराज चव्हाणांना असेलेला विरोध नाना पटोलेंसाठी लॉटरी मिळवून देणारा ठरला!)
आता येऊया मुख्य प्रश्नाकडे,
तर माझ्या वैयक्तिक मतानुसार आजघडीला तरी नाना पटोले हे काही राज्यपातळीवर सर्वश्रुत असलेले नेते नाहीत यामुळे राज्यातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणणे त्यांच्यासाठी पक्षाचा कार्यक्रम देणे,पक्षांच्या जिल्हाध्यक्षांवर पक्षाच्या वाढीसाठी आवश्यक दबाव आणणे व मुख्य म्हणजे सर्व कार्यकर्त्यांची मोट बांधून पक्षाची बूथ पातळी पर्यंत मोडकळीस आलेली व्यवस्था पुन्हा उभा करणे त्यांना सहजासहजी जमेल असे मला तरी वाटतं नाही या उलट काँग्रेसकडे अशोक चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण व तरुण चेहरा हवा असल्यास अमित देशमुखांसारखा चेहरा उपलब्ध होता तरी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष करणे हे अनेक काँग्रेसी नेत्यांच्याच पचनी पडलेलं नाही. प्रदेशाध्यक्ष झाल्या झाल्या त्यांनी पंतप्रधानांवर जी बालिश टीका करून आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा डंका पिटला या वरूनच त्यांच्या भावी वाटचालीची कल्पना येते, राज्यात काँग्रेस पक्षाला क्रमांक १ चा पक्ष बनवू वगैरे घोषणा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यास मदत म्हणून ठीक आहेत पण प्रत्यक्षात त्यांना रसातळाला गेलेल्या पक्षाला पुन्हा या उंचीवर आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल.
शेवटी राजकारण हा सर्व शक्य - अशक्य गोष्टींचा खेळ असल्यामुळे कधी कोणाचे नशीब कधी पालटेल हे सांगता येत नाही त्यामुळे नानांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा👍
- ऋषी भूमकर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,औरंगाबाद
Comments
Post a Comment