Was Gandhi really a Mahatma?
दिनांक - ३०/०१/२०२१ रोजी प्रकाशित,
गांधी खरचं महात्मा होते?
३० जानेवारी १९४८ रोजी झालेल्या गांधी वधाचा दोषी पंडित नथुराम गोडसे यांच्या समर्थन करणारे किंवा त्यांना शिव्या देणारे अनेक जण आपल्याला दिसतील पण याबाबतीत
गांधीवधाच्या निमित्ताने माझे वैयक्तिक विचार मी येथे मांडतो!
काहीजणांना हा लेख गांधी हत्येचे समर्थन करणारा वाटेल पण इथे कोठेही त्यांच्या हत्येचं समर्थन नाहीये!
आयुष्यभर स्वतः चे विचार, स्वतः चे नियम, स्वतः ची तत्वे हे जपण्याच्या नादात या अखंड हिंदू राष्ट्राची अधोगती यांच्याच चरख्याच्या सुताने विणली,
गांधी कोणाला कितीही अहिंसेचे पुरस्कर्ते वाटो, पण सर्वात मोठा नरसंहार हा याच ढोंगी दुरात्म्यामुळे घडला,
अखंड देश तीन भागात विभागला गेला,
मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यात यांचा हात कोणीही धरू शकणार नाही
मग् ते खिलाफत चळवळीला पाठिंबा देणे असो अथवा फाळणीच्या मागणीला समर्थन असो!
हा निर्णय घेताना मी फार व्यथित झालो होतो हे वाक्य म्हणून हजारो लोकांचा नरसंहार थांबला का?
सध्य स्थितीतील पाकिस्तानातून आपल्या वडिलोपार्जित संपत्ती,जमीन, घर-दारं एका क्षणात सोडून लोकांना जीव वाचवून पळून यावे लागले!
यात कित्येक लोकांचे कुटुंबच्या कुटुंब उ्ध्वस्त झाले, एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं!
राम राज्याच्या संकल्पना वगैरे कागदावर ठीक वाटतात पण प्रत्यक्षात आपल्या अडेलतट्टू स्वभावामुळे या देशातील कित्येक क्रांतिकारकांचे हकनाक बळी गेले, अहिंसेच्या बोथट हत्यारामुळे देशाचे स्वातंत्र्य दोन दशकं लांबले, या देशात १८५७ सारखा उठाव पुन्हा होऊ नये म्हणून १८८५ साली
एलेन ओक्टेवियन ह्यूम यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या काँग्रेसचे हे अघोषित सर्वेसर्वा झाले व मरेपर्यंत इंग्रजांची पुरेपूर खुशाली सांभाळली
*सुभाषचंद्र बोस* यांच्यासारख्या कर्तृत्ववान युवकाला बाजूला सारून त्यांच्या जागी नेहरूंसारख्या खुषालचेंडू माणसाला पंतप्रधान बनवण्यामागे ही यांचेच आशिर्वाद होते,
देशात फाळणीची मागणी जेंव्हा जोर धरत होती तेंव्हा बंगाल प्रांतातील मुस्लिम बहुल भागात हिंदू स्त्रियांवर अन्न्वयित अत्याचार,बलात्कार होत होते तेव्हा तेथील स्त्रियांनी जेंव्हा याबाबत गांधीजींकडे मदत मागितली असता बलात्कार होत असेल तेव्हा अशी जर वेळ आलीच तर श्वास रोखून स्वतः चा जीव द्या असले मूल्यवान सल्ले देणारे हेचं महात्मा होते!
सत्याचे प्रयोग या आत्मचित्रात्मक पुस्तकात तर यांचे जे थेरं आहेत ते तर न चर्चिले तर उत्तमच!
शेवट करताना मला एका प्रश्नाचे उत्तर तमाम गांधीप्रेमी,अहिंसावादी तथाकथित पुरोगामी लोकंकडून हवे आहे,
आपल्या म्हणन्या नुसार ज्या माणसाला आयुष्यभर अहिंसेचा स्वीकार केला त्यांच्या वधानंतर त्यांच्याच अनुयायांनी ब्राम्हण समाजाचा जो नरसंहार केला जवळपास ८००० पेक्षा जास्त ब्राह्मणांच्या कत्तली केल्या, स्त्रियांवर अत्याचार केले हे गांधींच्या कोणत्या अहिंसेच्या तत्वात बसणारे होते??
फाळणीच्या वेळेस झालेल्या नरसंहाराचं पापं अहिंसेचे स्वीकार करून फिटणार आहे?
विषय फार न लांबवता स्वा. विनायक दामोदर सावरकरांच्या एका वाक्याने शेवट करतो,
"देश जर सुरक्षित ठेवायचा असेल तर देशाच्या सीमा या चरख्याच्या सुताने नव्हे तर तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात तेव्हा तुमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिम्मत देखील होणार नाही"
सरते शेवटी हा प्रश्न पडतोच,
Was Gandhi really a Mahatma?
- ऋषी भूमकर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद.
Comments
Post a Comment