सेनेचे भविष्य?
दिनांक -१३/१०/२०२० रोजी प्रकाशित,
कोणत्याही राज्याचा/प्रदेशाचा विकास मुख्यत्वे भारतासारख्या विकसनशील देशात हा एका ५ वर्षांच्या काळात होणे फार कठीण असते,पण २०१४-२०१९ या आपल्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक चांगल्या योजना राज्याला दिल्या, यात प्रामुख्याने जलयुक्त शिवार सारखी योजना असो, राज्यातल्या कारखानदारी संदर्भातील त्यांचा पाठपुरावा असो विविध उद्योग-व्यवसायांना चालना असो मुंबई मेट्रो,पुणे मेट्रो,नागपूर मेट्रो,मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प असो इत्यादी व अनेक योजनांना त्यांनी पाठबळ दिले व यामुळे राज्य निश्चित विकासाच्या मार्गावर आरूढ झाले ही गोष्ट कोणी नाकारणार नाही.
राहता राहिला प्रश्न सेनेचा तर त्यांनी सरळ-सरळ सत्तेच्या मोहापायीं लोकांनी एकत्रित निवडून दिलेल्या युतीला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत सरकार स्थापन केले व यानंतर केवळ आणि केवळ जुन्या सरकारच्या योजनांना स्थगिती लावण्याचे काम केले,
उद्धव ठाकरे सरकार हे केवळ राजकीय सुडापोटी राजकारण करत आहे हे याच गोष्टींनी सिद्ध होते की,जलयुक्त शिवार अभियान असो, मुंबई-पुणे हायपर लूप योजना असो या व अशा ४६ योजना ज्या मागील सरकारच्या काळात सुरू केल्या होत्या त्या यांनी बंद पाडल्या,
मुंबईतील आरे येथील प्रस्तावित मेट्रो रेल्वे च्या कामासाठी अधिग्रहित केलेली जमीन केवळ आपल्या पुत्राच्या बालहट्टापायी दूरवर नेऊन ठेवली यात महाराष्ट्र शासनाचा न केवळ ५००० कोटींच्या वर चुराडा होणार आहे तर जी मेट्रो १ वर्षात चालू झाली असती ती आता अनियंत्रित काळासाठी रखडली जाणार आहे,
मुंबई सारख्या प्रचंड गर्दीच्या ठिकाणी हा निर्णय घेऊन सरकारने काय साधले आहे या प्रश्नाचे उत्तर ठाकरे पिता-पुत्रांकडेच असू शकते.
कोरोना काळात ज्या पद्धतीने ठाकरे सरकारने राज्याला वाऱ्यावर सोडले,राज्यात कोकण/विदर्भातील पुराच्या वेळेस साधी त्या भागांना भेट देण्याचे सौजन्य देखील हे ठाकरे दाखवू शकले नाहीत याउलट कोरोना काळात संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालणाऱ्या देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांसारख्या नेत्यांवर टीका केली. अनंत करमुसे मारहाण प्रकरणं असो,पालघर येथील साधूंची निर्घृण हत्या असो राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो कोव्हिडं सेंटर मधील बलात्काराच्या घटना असो या सर्व विषयांवर ठाकरे सरकार सोयीस्कर रित्या शांत बसल्याचे दिसून आले.
आपण सरकारमध्ये आहोत,महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री आहोत हे पार विसरून जाऊन उद्धव ठाकरेंनी सरकार चालवण्याचा जो बालिशपणा दाखवलाय तो कमालचं आहे!
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणांत केलेले हस्तक्षेप असो अर्णब गोस्वामी/कंगना रनौत यांच्या सोबत सूडबुद्धीने केलेले राजकारण असो हे सर्व पाहून महाराष्ट्रातील जनता अजूनही सेनेवर विश्वास ठेवेल???
जर स्वतःच एखादा व्यक्ती आत्महत्या करत असेल तर त्याला मारण्याचे पापं कोणी का घ्यावे? या न्यायाने सेनेच्या अधोगतीस सेना स्वतः कारणीभूत आहे.सेनेच्या अधोगतीसाठी देवेंद्र फडणवीस यांना काही विशेष प्रयत्न करावे लागतील असे मला वाटतं नाही
सेनेच्या विध्वंसाला केवळ आणि केवळ ही स्वतः शिवसेनाच आणि त्यांचे पुत्रमोहात आकंठ बुडालेले पक्षप्रमुखचं जबाबदार असतील यात शंका नाही.
-ऋषी भूमकर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,औरंगाबाद
Comments
Post a Comment