मानवतेची क्रूर चेष्टा
दिनांक:- ०३/०६/२०२० रोजी प्रकाशित, २७ मे रोजी केरळातली मल्लपुरम नावाच्या गावात एका गर्भार हत्तीणीला अन्नात फटाके देऊन तिची हत्या करण्यात आली, जेंव्हा ही बातमी ऐकली तेंव्हा मन सुन्न झालं, मानवाची क्रुरता इतक्या नीच पातळीवर गेलीये…? याबाबत प्रश्न पडला आपल्यात काहीच संवेदना,माणुसकीची भावना राहिली आहे की नाही???? मी दर वेळेस एखाद्या विषयावर ब्लॉग लिहिताना सोबत त्यासंदर्भात एखादे छायाचित्र जोडता येईल का ते पाहतो जेणेकरून ब्लॉग अजून आकर्षक वाटेल पण इथे मी तसं करू शकलो नाही,मी त्या निष्पाप हत्तीणीचे छायाचित्र पाहू देखील शकलो नाही… आज मला देशातल्या तमाम धर्मनिरपेक्षतेचा ठेका घेऊन बसलेल्या स्युडोसेक्युलर लोकांना प्रश्न विचारायचा आहे… आपण ज्या केरळच्या सुशिक्षित लोकांचे नेहमी गोडवे गातात येथे धर्मांधता नाहीये म्हणून इतर राज्यांची खिल्ली उडवता (म्हणजे हिंदू लोकांच्या हिंदुत्वाची धर्मांधता, कारण मुस्लिम,ख्रिस्ती लोकांनी काहीही केलेले चालते, धर्मनिरपेक्षता केवळ हिंदूंनीच पाळावी हा अलिखित नियम) सुशिक्षित नागरिक कसे कम्युनिस्टांना निवडून देतात, ज्या राज्यांत साक्षरतेचे प्रमाण कमी आहे तिथेच केवळ भाजपा...