नेहरूंच्या स्मृतीदिनी अभिवादनाच्या पायघड्या घालणारी शिवसेना, सावरकरांना हाच सन्मान देणार का?

दिनांक:-२७/०५/२०२० रोजी प्रकाशित,

सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणे हे काही राजकीय पक्षांसाठी नवीन गोष्ट नाही,निवडणुकीच्या काळात अनेक गोष्टींची आदान-प्रदान, पैशांचा बेसुमार वापर, जातीयवादाचा घेतलेला आधार,हिंदू-मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करणे हे सर्व राजकीय पक्षांच्या सोईचे राजकारण असते,राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो वेळप्रसंगी आपल्याला सहजासहजी कळणार ही नाही अशा गोष्टी सर्वच राजकीय पक्ष त्यांचे नेते स्वतःसाठी,पक्षासाठी करतच राहतात.

या सर्वांवर एक गोष्ट मात्र असते ती म्हणचे पक्षाची विचारधारा

ज्या विचारधारेवर आपण वाढलो,टिकलो मोठे झालो त्याचा विसर पडणे ही खूप शरमेची बाब आहे, राजकारणात सत्ता कोणाला नको आहे?? पण त्यासाठी आपली राजकीय ओळख,आपले मतदार त्यांची मानसिकता यांनाच दूर लोटून आपण सत्तापिपासु झालात हे सर्वसामान्य शिवसैनिक कधीच स्वीकारू शकणार नाही, नेते वरच्यावर एकत्र येतात,दूर जातात आपला स्वार्थ साधून घेतात परंतु यात नेहमी भरडला जातो तो केवळ आणि केवळ कार्यकर्ताच….

आज भलेही शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन केलेले आहे तरी सर्वसामान्य कार्यकर्ता आज याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बाळासाहेबांच्या केवळ एका शब्दावर शड्डू ठोकून उभा राहायचा तो पार खचून गेलाय, आज तो उघड-उघड सेनेला विरोध करणारही नाही पण हिंदुत्वाला,बाळासाहेबांच्या रक्ताचं पाणी करून उभ्या केलेल्या हिंदुत्वाच्या धगधगत्या सेनेला आपल्या कट्टर हिंदुत्वाला तिलांजली देऊन केवळ सत्तेसाठी लाचार झालेल तो सहन करूच शकणार नाही.

आपल्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट आहे, राहुल गांधींच्या मी माफी मागणार नाही,मी माफी मागायला काय सावरकर आहे का? या विधानानंतर सेनेच गप्प बसणं,स्वतः उद्धव ठाकरेंच मौन बरंच काही सांगून जात यामुळे सत्तेच्या सारीपाटात मुख्यमंत्रीपदासाठी आंधळी झालेली सेना आता कधीही सत्तेत असेपर्यंत सावरकरांचा योग्य तो सन्मान कधीच करू शकणार नाही

-ऋषी भूमकर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

Comments

Popular posts from this blog

उद्धव ठाकरे एक आदर्शवादी मुख्यमंत्री?

सोनू सूद:भाजपचा एजंट??

महाराष्ट्र बचाओ आंदोलन