संभाजी ब्रिगेड: नवजिहादी संघटना
दिनांक:-२८/०५/२०२० रोजी प्रकाशित,
सर्वप्रथम ही संभाजी ब्रिगेड ही काय भानगड आहे ते आपण पाहू,
संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्रातील एक मदरश्याच्या पैशावर चालणारी संघटना आणि राजकीय पक्ष आहे. संभाजी महाराज यांचे नाव या संघटनेला दिले आहे. पुरुषोत्तम खेडेकर हा या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे छत्रपती शिवरायांचा खोटा आणि जातीयवादी इतिहास पसरवण्याचा काम ही संघटना करते,ही संघटना हिंदू द्वेष व ब्राह्मण द्वेष समाजात पसरवण्याचा काम करते मराठ्यांच्या नावाखाली या संघटनेत फुटीरतावादी विचारांचे लोक कार्य करतात,पुरुषोत्तम खेडेकर ला ब्राह्मण समाजा विरोधात केलेल्या लिखाणासाठी रत्नागिरी जिल्हा न्यायालयात माफी मागून पुस्तक मागे घ्याव लागल लागलं होतं संभाजी ब्रिगेडचे विद्यमान अध्यक्ष मनोज आखरे आहेत. मराठा सेवा संघाच्या या "संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट पडली असून, राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या मंडळींनी स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली आहे. प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
ब्रिगेडची हिंसक कामे
१)भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला : जेम्स लेन यांनी लिहिलेल्या शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकातील जिजाबाई यांच्या तथाकथित बदनामीचा संशय घेऊन संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला. या प्रसंगी ब्रिगेडच्या ७२ तरुणांना पोलिसांनी अटक केली. २०१७ साली या खटल्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये सर्वच ७२ जणांवर आरोप सिद्ध न करता आल्याने त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले.
२)रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी तोडला होता.
संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केला. याचे म्हणणे असे होते की हा शिवाजी महाराजाचा कुत्रा नव्हता.
३)पुणे महापालिकेच्या महापौर कार्यालयावर केलेला हल्ला: ब्रिगेडचे ४० ते ५० लोक कार्यालयात घुसले आणि तोडफोड केली.
४)महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील य़ांच्यावर हल्ला: शिवाजी : द हिंदू किग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकावरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली, त्यावेळेला ब्रिगेडच्या लोकांनी आर. आर. पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले.
५)महाराष्ट्रभूषण शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शाईफेक
ज्या माणसाची संपूर्ण हयात शिवाजी महाराजांच्या अलौकिक कार्याची सेवा करण्यात गेली त्या माणसावर या बौद्धिक दिवळखोरांकडून हल्ला होणे यावरूनच या लोकांना शिवाजी महाराज किती कळाले हे कळून चुकते
६)पुण्याच्या संभाजी उद्यानातला राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडून या ब्रिगेडयांनी नदीत फेकला.
टीप:-उपरोक्त माहिती हे माझे मतं नसून ती जशीच्या तशी विकिपीडियावर उपलब्ध आहे आणि ती तितकीच खरी आहे याबाबत मला १०१% खात्री आहे.
आता वळू आपल्या प्रश्नाकडे,
अमेरिकन लेखक जेम्स लेन याने ‘शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या माताेश्री जिजाबाई यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केले आणि या लेखकास हे लेखन करण्यासाठी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या मंदिर या संस्थेतून माहिती पुरवण्यात अाली,असा संभाजी ब्रिगेडचा अाराेप हाेता. याच राेषातून ५ जानेवारी २००४ राेजी सुमारे शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांनी भांडारकर संस्थेवर हल्ला करत ताेडफाेड केली हाेती. याप्रकरणी पाेलिसांनी ७२ अाराेपींना अटक केली हाेती.
अमूल्य संशाेधन ठेव्याचे नुकसान
भांडारकर संस्था ही ऐतिहासिक व अांतरराष्ट्रीय दर्जाची भारतातील एकमेव संशोधन संस्था आहे. या संस्थेत अंदाजे १,२५,००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९,५१० हस्तलिखिते आहेत. हल्लेखाेरांनी या संस्थेतील टाटा हाॅल, ग्रंथालय, प्राकृत व हस्तलिखित विभागातील पुस्तकांचे रॅक, खुर्च्या, कपाटे, संगणक, फाेटाे फ्रेम, खिडक्या दरवाजांच्या काचा फाेडून दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह नष्ट करण्यात अाला हाेता. सरस्वती देवीची मूर्ती फाेडून निझामाच्या फाेटाे अल्बमसह अनेक दुर्मिळ वस्तू चाेरीला गेल्या हाेत्या. यात संस्थेचे सुमारेे एक काेटी ३० लाख २६ हजार रुपयांचे नुकसान झाले हाेते,
भांडारकर संस्थेवर हल्ला करणाऱ्यांमध्ये कळंब, उस्मानाबाद, गेवराई, बीड, पंढरपूर अादी शहरांतून कार्यकर्ते जीप, ट्रॅक्स, सुमाे, कार अादी वाहनांनी इंदापूर येथील उजनी धरणाजवळ ५ जानेवारी २००४ राेजी एकत्र जमले हाेते. सकाळी दहा वाजता त्यांनी पुण्यात येऊन घाेषणाबाजी करत भांडारकर संस्थेच्या इमारतीवर दगडफेक केली हाेती. संस्थेचे शिपाई नरसिंह नवलू थाेपटे (वय ६५) व इतर कर्मचाऱ्यांना मारहाण करून थाेपटे यांच्या गळ्यातील १५ हजार रुपयांची साेन्याची चेन चाेरून नेण्यात अाली हाेती.
पुढे यासर्वांची सबळ पुराव्यांच्या अभावे २०१७ साली निर्दोष मुक्तता करण्यात आली.
माझे मतं,
अशा जातीयवादी संघटना या आपल्या समाजासाठी,देशासाठी नेहमीच हानिकारक असतात कोणत्यातरी महापुरुषांचे नाव आपल्या संघटनांना चिटकवायचे आणि नंतर मनमानी कारभार चालवून जातीयवाद पसरवायचा,काहीतरी फालतू, तथ्यहीन विचारांना पुढे करून विशिष्ट समाजाविषयी द्वेष पसरवण्याचा उद्योग हे लोकं करत राहतात.यासाठी यांच्यावर राजकीय नेत्यांचा वरदहस्त असतो आणि आपले नीच राजकारण रंगवण्यासाठी ते असल्या फालतू संघटनांचा वापर करून घेतात आणि वापरून झालेल्या निरोधासारखे त्यांना फेकून देतात.
भांडारकर सभागृह हे एक जागतिक पातळीवरील ऐतिहासिक वारसा लाभलेले संशोधन केंद्र आहे येथील जुन्या,ऐतिहासिक घटनांची साक्ष असलेले अनेक दस्ताऐवज, वस्तू यांचे नुकसान करून या बौद्धिक दारिद्रय असलेल्या लोकांनी एकप्रकारे इतिहासाची गळचेपीच केली आपला आक्षेप नोंदवण्याचे अन्य माध्यम देखील असतात पण अशा मार्गांचा अवलंब केल्यास यांचे मानसिक समाधान कसे होणार???
जातीयवादाची किनार पकडून केवळ आणि केवळ ब्राम्हणद्वेष करण्याच्या वेडात ही संघटना मुस्लिमांचे लांगूलचालन कधी करू लागली हे त्यांना ही कळाले नाही आणि मुख्य म्हणजे ते यात धन्यता मानतात हा भाग वेगळाच
हिंदू धर्मात फूट पाडणे, जाती-जातींत द्वेष निर्माण करणे,एखाद्या विशिष्ट जातीला टार्गेट करून चक्क त्यांची कत्तल करा असले फतवे काढणे हा एक प्रकारचा जिहादच आहे,यामुळे ही ब्रिगेड आधुनिक जिहादी संघटनाच आहे यात दुमत नसावे
पैशांचे नुकसान एकवेळ भरूनही येईल परंतु अशा पद्धतीने या जिहादी संघटनेकडून करण्यात आलेले वैचारिक नुकसान कधीही न भरून येण्यासारखे आहे...
-ऋषी भूमकर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
चित्रस्रोत:-गुगल महोदय
स्रोत-
Comments
Post a Comment