"वन नेशन,वन रेशनकार्ड" धर्तीवर "वन नेशन,वन लेसन" ही शैक्षणिक योजना अवलंबवणे योग्य की अयोग्य?

दिनांक:-२८/०५/२०२० रोजी प्रकाशित,

निश्चितपणे हा निर्णय जर अंमलात आणला गेला तर याचा फायदा होवू शकतो, सुरवातीला तत्वतः याची अंमलबजावणी व्हावी आणि तद्नंतर याचे फायदे,तोटे लक्षात घेऊन त्यात शक्य त्या सुधारणा/बदल घडवून संपूर्ण देशात याची अंमलबजावणी व्हावी.एखाद्या राज्याचे शैक्षणिक धोरण ठरवण्याचा अधिकार जरी त्या त्या राज्याला असला तरी देशपातळीवर एकच अभ्यासक्रम असण्याचे अनेक फायदे आहेत, आज आपण मेडिकल/इंजिनिअरिंग सारख्या शाखेचें ऍडमिशन देशपातळीवर एकच परीक्षा घेऊन करतो व उत्तमोत्तम विद्यार्थी निवडतो त्याच प्रमाणे अशी शिक्षणपद्धती अवलंबवण्यास काहीच हरकत नसावी.

"वन नेशन,वन लेसन" ही योजना जर कार्यान्वित झाली तर होणारे फायदे:-

  • संपूर्ण देशात आपण एकसारखी शिक्षणपद्धती कार्यान्वित करून देशातील उत्तम,कार्यशील शिक्षणाचा दर्जा प्राप्त करू शकतो
  • या योजनेअंतर्गत जर आपल्या देशातील पिढी शिकली तर शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवण्याची शक्यता नक्कीच वाढू शकते.
  • ही योजना जर सफल झाली तर देशात बिहार,उत्तरप्रदेश इत्यादी राज्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल,तेथील विद्यार्थ्यांची शिक्षणात रुची वाढेल याचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष फायदा देशालाच होईल,न केवळ केरळ,तामिळनाडू, आंध्रप्रदेश सारखी राज्ये तर इतरही राज्ये आपला शैक्षणिक दर्जा उंचावतील
  • यासाठी प्रत्येक राज्यांत एक शैक्षणिक समिती घटित करावी ज्यामध्ये त्या त्या राज्यांतील हुशार,कर्तबगार लोकांची त्या समितीवर निवड करून त्या राज्यांतील संस्कृती, इतिहास याचा त्यांच्या अभ्यासक्रमत समावेश असावा परंतु सर्व राज्यांचा मूळ अभ्यासक्रमाचा ढाचा/पॅटर्न एकच असावा.
  • यामुळे शिक्षणाचा दर्जा तर उंचावेलच पण नीट,जेईई सारख्या स्पर्धापरीक्षा देताना देशातील कोणत्याही कोपऱ्यातील विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत.
  • यामुळे एखाद्या राज्यातील सरकार बदललं की अभ्यासक्रम बदल असले चाळे होणार नाहीत व विद्यार्थी एक सलग उत्तम दर्जाचे शिक्षण घेऊ शकतील.
  • सध्या CBSE पॅटर्न वापरणाऱ्या शाळा उपलब्ध आहेत परंतु आजही हे शिक्षण ठराविक वर्गातील लोकांपुरतेच मर्यादित आहे, "वन नेशन,वन लेसन" या योजनेद्वारे या अव्वल दर्जाच्या शिक्षणाचा लाभ समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवता येईल.
          -ऋषी भूमकर
           शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

Comments

Popular posts from this blog

उद्धव ठाकरे एक आदर्शवादी मुख्यमंत्री?

सोनू सूद:भाजपचा एजंट??

महाराष्ट्र बचाओ आंदोलन