महाराष्ट्र बचाओ आंदोलन
दिनांक-२१/०५/२०२० रोजी प्रकाशित,
कॊरोनाच्या जागतिक संकटात महाराष्ट्रात जो काही सावळा गोंधळ या तीन चाकांच्या तिघाडी सरकारने घालून महाराष्ट्र राज्याची जी भयानक अवस्था करून टाकली आहे त्याविषयी महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या वतीने आयोजित केलेले हे महाराष्ट्र बचाओ हे आंदोलन नक्कीच योग्य आहे,
राजकारण करू नका म्हणता म्हणता आपण कोणत्या खालच्या थरावर जाऊन राजकारण करून आपल्या राज्याची अक्षरशः वाट लावली हे ठाकरे सरकारला काळायलाच हवं,
अनंत करमुसेचे बंगल्यावर नेऊन मारहाण प्रकरण असो, वाधवान कुटुंबातील लोकांना लॉकडाउन च्या काळात मानवतेच्या दृष्टिकोनातून फिरण्याची दिलेली परवानगी असो, राज्यभर तब्लिघी जमातीतील लोकांचा होणार सुळसुळाट असो त्यावर कोणतेही ठाम भूमिका ठाकरे सरकारने घेतली नाही, परराज्यातील मजुरांच्या प्रवासखर्चाबाबत असलेली सरकारची मानसिकता आपण सर्वांनीच पहिली, मुंबई सारख्या ठिकाणी कॊरोना ज्या वेगाने वाढला त्याविषयी उपाययोजना आखण्याऐवजी आपल्या आमदारकीसाठी उद्धव ठाकरेंनी जो गोंधळ घातला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, जितकी मरमर ठाकरेंना आपल्या आमदारकी विषयी होती तितकी जर राज्याविषयी त्यांनी दाखवली असती तर आज महाराष्ट्रात इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली नसती,
प्रशासकीय कामात कमालीचा ढिसाळपणा आपण पहिला, आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सरकारच्या कृपेने कोरोनाग्रस्त पोहोचला आहे,
सरकारच्या ढिसाळ धोरणांमुळे रेड झोन कंटेन्मेंट झोन झाले, ऑरेंज झोन रेड झोन झाले आणि ग्रीन झोन ऑरेंज झोन झाले, दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा राज्यात प्रसार होत असताना आपले माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून कोमट पाणी,कोथळा,पत्ते, कॅरम, तलवार,ढाल, असल्या बाष्कळ आणि बालिश गप्पा मारतात, राज्यपालांच्या सोबत जेंव्हा कोरोनाविषयी चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा हेच आमदारकीसाठी हापापलेले उद्धव ठाकरे चक्क आपल्या स्वीय सहाय्यकला त्या बैठकीला पाठवतात
या व अशा अनेक गोष्टींविषयी विरोधी पक्षाच्या वतीने काहीही चकार शब्द निघू नये असे जर सरकारला वाटत असेल तर ते होणे शक्य नाही
यामुळे महाराष्ट्र बचाओ हे आंदोलन नक्कीच योग्य आहे व यामुळे सरकारला वेळीच जाग येऊन ते राज्यातील बिघडणाऱ्या परिस्थिती विषयी सजग होतील हीच अपेक्षा
-ऋषी भूमकर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
Comments
Post a Comment