पत्रकारितेतले दलाल
दिनांक:-२९/०५/२०२० रोजी प्रकाशित,
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो,लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी पत्रकारिताही तेवढीच प्रामाणिक,निर्भीड व सर्वात महत्वाचे म्हणजे नि:पक्षपाती असायला हवी,
न्यायालयात जसं न्यायाधीशाला न्यूट्रल राहून भावनिकतेपेक्षा वास्तविकतेवर भर देऊन नि:पक्ष न्याय द्यायचा असतो त्याच न्यायाने पत्रकारितेत पत्रकाराने कोणतीही बातमीचे स्वतःच्या मनाने फाजिल अर्थ न लावता वास्तविकतेला ओळखुन सत्यबाजू लोकांसमोर मांडायची असते पण जे पत्रकार या गोष्टी टाळून स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ पाहतात त्यांना मी पत्रकार म्हणत नाही ते लोकशाहीचे दलाल असतात फक्त दलाल.
मराठी पत्रकारितेत सत्तांतर झाल्यानंतर बेडूकउड्या मारणारे दलाल जमातीचे अनेक पत्रकार मी सांगू शकतो पण त्यातल्या त्यात दलाल मेरिटचे ३ पत्रकार मी येथे मांडतो,
१)कुमार केतकर
या माणसाला कुमार म्हणावं की सुमार इतकी याची खांग्रेस धार्जिणी पत्रकारिता आहे सध्या साहेब काँग्रेसचे राज्यसभेतले खासदार आहेत, अधून मधून मोदी कसे नालायक आहेत ते कसे निवडणुकाच घेणार नाहीत असल्या गमजा मारत असतात पण २०१९ साली जेंव्हा मोदी प्रचंड मताधिक्याने विक्रमी खासदारांसहित निवडून आले तेव्हा EVM मधला घोळ वगैरे विषयांवर चौफेर बडबडणारे व स्वतःचा हसं करून घेणारे हे चक्क मतदारच कसा बावळट आहे जो की मोदींना सलग दोन वेळेस निवडून देतो असली विधाने करतात, आता मतदार बावळट आहे की हे स्वतः? हे लोकांनीच ठरवावे.
२)गिरीश कुबेर
नुकतेच यांचे नामकरण कॉपी-पेस्ट कुबेर असेही झाले याला कारण म्हणजे थोड्याचं दिवसांपूर्वी साहेबांची चोरी पकडण्यात आली अँड्र्यू लिलिको नामक पाश्चिमात्य पत्रकाराचा लेख साहेबांनी जशाचा तस्सा मराठीत अनुवाद करून छापला होता नंतर माफी वगैरे मागण्याचे सौजन्यही यांच्याकडे नाहीं. मराठी वाचक हा बावळट आहे आपण काहीही छापू आणि हा वाचत राहिल या भ्रमात हे जगत असतात.
स्वतःला तथाकथित इंटलेकच्युअल म्हणवुन घेताना हे लोकांना कायम वेड्यात काढतात, देशाला न लाभलेले अर्थमंत्री असा मी यांचा उल्लेख करेल😅
यांचे अजून काही किस्से सांगण्यासारखे आहेत,
याकूब मेनन ला जेंव्हा फाशी झाली तेव्हा ज्या काही तथाकथित शहाण्या बुद्धीमंत लोकांचा त्या फाशीला विरोध होता त्यातलेच एक हे कुबेर महाशय देखील होते, गुन्हा हा त्याच्या भावाने केलाय त्याने नाही हे अगदी घसा फाडफाडून हे सांगत होते अर्थात त्यात काही तथ्य नव्हतेच...
माजिद मेननच्या वेळेस देखील साहेबांना असेच त्याचा या दहशतवादी कटात समावेश नव्हता त्याला त्यात अडकवल गेलंय असे अग्रलेखांचा यांनी फडशा पाडला होता.
यांचे लेख सर्वसामान्य वाचकाला समजण्याच्या पलीकडचे असतात व त्यातून मी कसा शहाणा हे यांना सिद्ध करायचे असते, काहीतरी अचाट,शक्य नसलेल्या शक्यता वर्तवायच्या आणि लोकांना भ्रमित करायचे हीच यांची पत्रकारिता...
या देशात हिंदूंवर टीका करताना यांचा हात कधीच थकत नाही,मागे एकदा मदर तेरेसांवर यांनी एक अग्रलेख लिहिला होता पण यांच्या वर्तमानपत्राच्या मालकांनी डोळे वटारले की यांना नाईलाजास्तव तो मागे घ्यावा लागला बाकी पाश्चिमात्य वामपंथी लेखकांचे लेख हे चोरून छापतात की काय हा संशय आता बळावायला लागला आहे हे मात्र खरे😅
३)निखिल वागळे
वरील दोघांना जर एकत्र करून त्यांना पिळून जर त्याचा अर्क काढला तर तो होईल निखिल वागळे,यांच्याएवढी पत्रकारितेतली कमालीची दलाली आपणास कोठेही पाहायला मिळणार नाही, सर्व चॅनल्स वरून अक्षरशः यांची हकालपट्टी झाल्यावर मॅक्स महाराष्ट्र चॅनेलच्या युट्यूब चॅनेलवर हे तथ्यहीन गप्पा मारत राहतात मोदी,फडणवीस,भाजपा हे यांचे आवडतीचे विषय यांच्यावर तोंडसुख घेतल्याशिवाय यांना दररोजचे अन्न गोड लागत नसावे, यांच्या दलालीचीचे उदाहरण म्हणजे यांनी आपली संपूर्ण उमेदीची हयात आपल्या महानगर या वृत्तपत्रातून शिवसेनेवर टीका करण्यात घालवली आणि आज तेच महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यांत सरकार आल्यानंतर त्यांचे कौतुक करताना थकत नाहीत,
यांच्या विषयी सांगण्यासारखं बरंच आहे पण आपणास अगदी सखोल माहिती हवी असल्यास आपण श्री.भाऊ तोरसेकर यांच्या प्रतिपक्ष या युट्युबचॅनेलवर जाऊन 'वागळे की दुनिया' या व्हिडीओज ची ३ भागांची मालिका पहावी तिथे यांची सखोल चिरफाड भाऊंनी केली आहे.
तूर्त एवढेच😊
लिखाणाचा वेळ १ तास १४ मिनिटे
चित्रस्रोत-गुगल बाबा
-ऋषी भूमकर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
Comments
Post a Comment