मानवतेची क्रूर चेष्टा
दिनांक:- ०३/०६/२०२० रोजी प्रकाशित,
२७ मे रोजी केरळातली मल्लपुरम नावाच्या गावात एका गर्भार हत्तीणीला अन्नात फटाके देऊन तिची हत्या करण्यात आली,
जेंव्हा ही बातमी ऐकली तेंव्हा मन सुन्न झालं, मानवाची क्रुरता इतक्या नीच पातळीवर गेलीये…? याबाबत प्रश्न पडला
आपल्यात काहीच संवेदना,माणुसकीची भावना राहिली आहे की नाही????
मी दर वेळेस एखाद्या विषयावर ब्लॉग लिहिताना सोबत त्यासंदर्भात एखादे छायाचित्र जोडता येईल का ते पाहतो जेणेकरून ब्लॉग अजून आकर्षक वाटेल पण इथे मी तसं करू शकलो नाही,मी त्या निष्पाप हत्तीणीचे छायाचित्र पाहू देखील शकलो नाही…
आज मला देशातल्या तमाम धर्मनिरपेक्षतेचा ठेका घेऊन बसलेल्या स्युडोसेक्युलर लोकांना प्रश्न विचारायचा आहे…
आपण ज्या केरळच्या सुशिक्षित लोकांचे नेहमी गोडवे गातात येथे धर्मांधता नाहीये म्हणून इतर राज्यांची खिल्ली उडवता (म्हणजे हिंदू लोकांच्या हिंदुत्वाची धर्मांधता, कारण मुस्लिम,ख्रिस्ती लोकांनी काहीही केलेले चालते, धर्मनिरपेक्षता केवळ हिंदूंनीच पाळावी हा अलिखित नियम)
सुशिक्षित नागरिक कसे कम्युनिस्टांना निवडून देतात, ज्या राज्यांत साक्षरतेचे प्रमाण कमी आहे तिथेच केवळ भाजपावाले निवडून येतात अशा थेऱ्या मांडतात तिथे पोटात गर्भ असलेल्या मुक्या जीवाला अन्नात फटाके बांधून क्रूरपणे ठार मारले जाते,त्या निष्पाप जीवाचा खून करण्यात येतो अशी निर्दयी घटना घडल्यानंतर मात्र आपली दातखीळ का बसते?
बरं ही केरळातली पहिली घटना आहे का?
याआधीही केवळ आणि केवळ हिंदू धर्मात गाय आणि बैलाचे(नंदी) महत्व आहे त्यामुळे इथे सरसकट दुभत्याजीवांचे कत्तलखाने चालतात,भर चौकात गाईचे,बैलाचे म्हशीचे धड वेगळे करून येथे त्याचा जल्लोष केला जातो,हीच आहे का तुमच्या साक्षरतेची व्याख्या??
एरव्ही जरा कोठे काही झाले की मोर्चे काढणारे,संविधान उरावर बडवून घेणारे IM Hindu, IM Ashmed असले फलक हातात धरणारे इथे मात्र शांत बसतात, माझे तर स्पष्ट मतं आहे की प्राण्यांच्या बाबतीतले कायदे आता अधिक कठोर होण्याची गरज आहे काही दिवसांपूर्वी टिक-टॉक नामक अँपवर एका श्वानाचे चारही पाय बांधून त्याला तलावात फेकतानाचा व्हिडीओ समोर आला होता तेंव्हाही केवळ चर्चा झाली आणि यथावकाश विषय मागे पडला मात्र आता कठोर पावले उचलण्याची वेळ आलेली आहे मुक्या प्राण्यांच्या जीवाची देखील मानवाच्या जीवाईतकीच किंमत असते हे समजण्याची वेळ आलेली आहे,आत निषेध नाही तर कायद्याची गरज आहे.
याबाबत माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, आमच्या कडे राजा नावाचा एक कुत्रा होता, तसं तो भटका गावरान श्वान होता परंतु आमच्याकडे नेहमी यायचा, आमच्या वडिलांना कुत्रे,मांजरे यांबाबत विशेष आवड आहे,मात्र जेंव्हा तो त्याच्या वृद्धापकाळात गेला तेंव्हा ३ दिवस अन्न न खाणाऱ्या माझ्या वडिलांचा चेहरा माझ्यानजरेसमोर आजही तरळतो, आमच्याकडील पाळीव मांजरांच्या पायांवर जेव्हा आमचा चुकून पाय पडतो तेव्हा त्याच्या ओरडण्याचा आवाज ह्रदयाचा ठोका चुकवतो,आमच्या गावाकडे कित्येक वर्षांपासून चुलीवरची पहिली भाकरी गाईला नंतरची आमच्या कुत्र्याला व मग घरच्या लोकांना ही रीत पाळणारी आम्ही लोकं आहोत,
एखाद्या प्राण्याच्या जीवाची अशी क्रूर हत्या झालेली पाहणे हे आमच्या सारख्या कमजोर हृदयाच्या लोकांना शक्यचं नाही.
आज मला माझ्या धर्माचा सार्थ अभिमान वाटतो जिथे मुक्या जिवाच्या प्राणांची किंमत मानवाच्या प्राणांइतकीच केली जाते,जिथे गाईला माता बनून पुजले जाते,जिथे बैलाच्या कष्टांची कदर केली जाते.
जर अशा प्रकारे मुक्या जीवांच्या हत्या आणि त्याच समर्थन हे कम्युनिझम असेल तर थुंकतो असल्या विचारसरणीवर….😡
आम्ही सनातनी धर्मांध जरी असलो तरी अर्ध्यातली अर्धी भाकरी मुक्या जीवाला देणे ही आमची संस्कृती आहे,
शेवटी एवढेच सांगेलं,
-ऋषी भूमकर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
Comments
Post a Comment