उद्धव ठाकरे एक आदर्शवादी मुख्यमंत्री?

दिनांक:- १५/०५/२०२० रोजी प्रकाशित,

उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांना दिलेल्या वचनाप्रमाणे "एखाद्या सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी विराजमान करेल" हे वचन अगदी तंतोतंत पाळून स्वतःलाच त्या पदावर बसवून जो आदर्श निर्माण केला आहे तो अगदी वाखाणण्याजोगा आहे.

  • आता उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला दिलेले बाकीचे आदर्श पाहू,
  1. निवडणुकांच्या आधी एखाद्या पक्षासोबत युती करून निकालानंतर केवळ आणि केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी ज्या पक्षांना आयुष्यभर शिव्यांची लाखोली वाहिली,आपल्या बापाने ज्यांच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्याच मांडीवर बसून सत्तेचा आस्वाद कसा घ्यायचा याचा आदर्श उद्धव ठाकरेंनी उभ्या महाराष्ट्राला घालून दिला.
  2. ज्या हिंदुत्वाच्या बळावर आपला पक्ष वाढला,टिकून राहिला त्या हिंदुत्वाला सत्तेसाठी सोयीस्कर रित्या तिलांजली कशी द्यावी याचा आदर्श उद्धव ठाकरेंनी संपूर्ण देशाला घालून दिला.
  3. आपल्या कर्तृत्ववान? मुलाला अगदी पहिल्या आमदारकीच्या टर्मला मंत्रिपद देण्यासाठी ३०-३० वर्ष पक्षासाठी जीवाचे रान करणाऱ्या लोकांना कसे डावलायचे याचा आदर्श उद्धव ठाकरेंनी घालून दिला.
  4. ज्या बांगलादेशी,पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून देण्याचा कायदा देशात लागू करावा यासाठी ज्या बाळासाहेबांनी आपल्या जीवाचे रान केले त्याच कायद्याला सिल्वर ओकच्या आणि इटलीमातेच्या दबावाखाली येऊन विरोध करण्याचा आदर्श उद्धव ठाकरेंनी घालून दिला.(संदर्भ-पंतप्रधानांच्या भेटीत या कायद्याचे समर्थन आणि पवार आजोबांनी डोळे वटारले की हा कायदा लागू करण्याबाबत पुनर्विचार करू अशी दिलेली घोषणा)
  5. स्वतःला या विषयातील काही कळत नाही,त्याविषयातील काही कळतं नाही,अर्थकारण कळतं नाही,प्रशासकीय अनुभव नाही अशा परिस्थितीत सुद्धा राज्य कसं चालवावे याचा आदर्श उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्राला घालून दिला.
  6. वर्षानुवर्षे मुंबई,औरंगाबाद सारख्या ठिकाणांवर सत्तेत असून विकास न करता हिंदू-मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण करून सतत निवडून कसे यायचे याचा आदर्श उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला घालून दिला(संदर्भ-मागील पावसाळ्यात झालेले मुंबईचे हाल,आणि एकेकाळी संपूर्ण आशिया खंडातील फास्टेस्ट ग्रोइंग सिटी म्हणून ओळखले जाणारे औरंगाबाद शहराची सद्याची अवस्था)

आता विचार करा की असे आदर्शवादी मुख्यमंत्री आपल्याला कधी मिळणार आहेत का???

शिवाय एवढ्या साऱ्या डाव्या,ढोंगी सेक्युलर,नेहमी मोदींच्या नावाने संविधान उरावर घेऊन ढोल बडवणाऱ्या लोकांनी उद्धवरावांच कौतुक केलं आहे म्हणल्यावर ते आदर्शवादी असणारच

(यांनी एवढा आदर्श दाखवू नये की आदर्श म्हणल्यावर यांच्याच मंत्रिमंडळातील "आदर्श" मंत्री अशोक चव्हाणांच्या ऐवजी याचंच नाव डोळ्यासमोर यावं)

-ऋषी भूमकर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

Comments

Popular posts from this blog

Was Gandhi really a Mahatma?

खराखुरा पँथर!