हिंदू लोक मुस्लीम राष्ट्रपतीवर प्रेम आणि त्यांचा आदर करू शकतात तर मुस्लीम लोक एका हिंदु पंतप्रधानासाठी तीच भावना का ठेवू शकत नाहीत?

दिनांक-२९/०४/२०२० रोजी प्रकाशित,

ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही की मुस्लिम धर्मियांच्या मध्ये इतर धर्मापेक्षा कट्टरता आणि धार्मिक द्वेष कमालीचा असतो ही बाब आपल्याला एवढ्याच उदाहरणावरून लक्षात येईल की आज हिंदू जरी बहुसंख्य असले तरी आपणास आज ढोंगी सेक्युलरवादाची चादर घेऊन हिंदूंवर, हिंदू संस्कृतीवर,हिंदू सण समारंभांवर टीका करणारे लाखो लोक सहजगत्या दिसतील,परंतु हीच गोष्ट मुस्लिमांच्या बाबतीत मात्र आपल्याला फार कमी नव्हे तर जवळपास दिसणारच नाही, तारेक फतेह सारखे बोटांवर मोजण्याइतके लोक आपणास आढळतील, हीच कट्टरता आज यांना इतर धर्माचा द्वेष करण्यास कारक ठरते.

आपल्याकडील ढोंगी पुरोगामी लोक आपल्याला सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली "सगळ्या धर्मात इतर धर्मांविषयी आदर करावा असे लिहिले आहे असे सांगितले जाते" मात्र मला तर असे दिसून येत नाही

*ला इल्लाह इल अल्हाह* या वाक्याचा अर्थ काय होतो की या जगात केवळ अल्लाह हा एकमेव ईश्वर असून बाकी कोणीही ईश्वर नाही. अशी शिकवणूक जर असेल याचा मग बाकीच्यांनी काय अर्थ घ्यायचा??

मुस्लिम समाजातील लोक हिंदूंचा किंवा हिंदू पंतप्रधानांचा द्वेष करण्यामागच्या अनेक कारणांत त्यांच्यात असलेला *अशिक्षितपणा* हा सर्वाधिक कारक असलेला मुख्य घटक आहे यांबरोबरच या अशिक्षिततेमुळे आलेला कुटुंब नियोजनाचा अभाव,धर्मगुरूंच्या नको तेवढ्या प्रभावाखाली जाण्याची वृत्ती,कोणत्याही गोष्टींचा सारासार विचार न करण्याची प्रवृत्ती हे घटक जोडीला येतात.

आज शिक्षणाच्या अभावामुळे मुस्लिम समाजातल्या मोठ्या लोकसंख्येला कोणीही धार्मिक तेढ निर्माण करणारा व्यक्ती मग तो मुल्ला,मौलवी असो अथवा असददुद्दीन ओवैसी सारखा नेता असो, पाकिस्तानातुन तसेच इतर अरब देशांच्या आलेल्या पैशांच्या बळावर येथील मुल्ला,मौलवी या लोकांच्या मनात इतर धर्मांविषयी व प्रामुख्याने हिंदु धर्मांच्या विरोधात भावना तयार करतात, जिहादच्या नावाखाली *गझवा-ए-हिंद* सारखे दिवास्वप्न दाखवतात, लव्ह जिहाद सारख्या योजनांचा भाग बनवतात.

मोदी जेंव्हा २०१४ साली सत्तेत आले तेव्हा देखील आत्ता मुसलमानांचे काही खरे नाही अशा वल्गना केल्या परंतु असे काही झालेच नाही कारण या सर्व अशा प्रखर इस्लामी,अतिप्रखर पुरोगामी मार्गदर्शक,घनघोर प्रबंधलेखक,फवारापटू आणि त्यांच्या असंख्य लाभार्थी उत्पादक लोकांच्या मनातील कल्पना होत्या.

हीच गोष्ट CAA आणि NRC,NPR यासंदर्भात जाणूनबुजून घडवण्यात आली आणि दिल्ली मधील शाहीनबाग हे ठिकाण या मोदीद्वेषाचे मुख्य केंद्र होते.

यामुळे माझे ही वैयक्तिक मत असे आहे की कोणी कितीही विष कालवले या लाखो वर्षांच्या दैदिप्यमान इतिहास असणाऱ्या देशात कोणत्याही जाती धर्माचे लोक हे गुण्यागोविंदाने नांदत आलेले आहेत आणि भविष्यात देखील गुण्यागोविंदाने राहणारच आहेत.पण जर यांच्या या नापाक हरकतींमुळे जर देशाच्या एकात्मकतेला तडा जाणार असेल तर हा द्वेष ठेचण्याशिवाय पर्याय नाही.

शेवटी एक गोष्ट नमूद करू इच्छतो की,

हिंदू जर मुस्लिमांचा तिरस्कार करत असतो तर या देशाच्या सर्वोच्च पदी अब्दुल कलामांसारखा माणूस भाजपासारख्या पक्षाच्या सत्तेवर असण्याच्या कार्यकाळात कधीच विराजमान झाला नसता.

यामुळे हिंदूंचा विरोध हा कलामांसारख्या मुस्लिमांना नसून नाही तर कसाबसारख्याला मनोवृत्तीच्या लोकांना आहे.

-ऋषी भूमकर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय,औरंगाबाद

Comments

Popular posts from this blog

उद्धव ठाकरे एक आदर्शवादी मुख्यमंत्री?

सोनू सूद:भाजपचा एजंट??

महाराष्ट्र बचाओ आंदोलन