विधानपरिषदेची उमेदवारी आणि भाजपा


दिनांक:- ०८/०५/२०२० रोजी प्रकाशित,

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार भाजपातर्फे विधानपरिषदेसाठी प्रविण दटके,गोपीचंद पडळकर, रणजित सिंह मोहिते पाटील आणि डॉ.अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

जशी ही यादी मीडियात आली तशीच भाजपने जुन्या निष्ठावंतांना डावलून आयारामांना संधी दिली अशा बातम्या चालू झाल्या, यामध्ये प्रामुख्याने पंकजा मुंडे, एकनाथराव खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे.

जास्त विषयांतर न करता थेट मुद्द्यावर येतो, पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या पक्षाविरोधात जे काही दंड थोपटले होते आणि आम्ही दुसऱ्या पक्षात देखील जाऊ शकतो अशी जी भीती दाखवली त्याचेच फळ दोघांना मिळाले बाकी मीडियावर जरी सतत बावनकुळे यांचं नाव दाखवत असले तरी ते विधानपरिषदेसाठी चर्चेत नव्हतेच, आता येऊ ज्यांची नावे जाहीर करण्यात आली त्यांच्याकडे,

डॉ. अजित गोपछडे आणि प्रविण दटके हे भाजपचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते आहेत त्यांना उमेदवारी देऊन पक्षाने निष्ठावंतांना तिकीट दिलेले आहे, आणि राहता राहिला प्रश्न गोपीचंद पडळकर आणि रणजित मोहिते पाटील यांचा तर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांची पंकजा मुंडे यांच्याशी असलेली जवळीक लपून नाहीये यामुळे जेथे पंकजा मुंडे यांनाच तिकीट नाही तिथे त्यांच्या या समर्थकांचे महत्व कमी करण्यासाठी आणि जानकारांऐवजी धनगर समाजाचे दुसरे नेतृत्व उभे करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांनी पक्षाने संधी दिली असावी तसेच गेल्या लोकसभेत आणि विधानसभेत विजयसिंह मोहिते पाटलांनी आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपला चांगलीच मदत केली होती, शिवाय मराठा समाजातील ते मोठे नेते आहेत अशावेळी त्यांच्या मुलाला म्हणजेच रणजितसिंह मोहिते पाटील यांना तिकीट देऊन पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने त्यांना संधी दिलेली असावी.

थोडक्यात भारतीय जनता पक्षाने दरवेळेस प्रमाणे यंदासुद्धा कठोर निर्णय घेऊन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे, आता पक्षाचा हा निर्णय किती यशस्वी होईल हे आपल्याला भविष्यातच कळेल.

-ऋषी भूमकर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

Comments

Popular posts from this blog

उद्धव ठाकरे एक आदर्शवादी मुख्यमंत्री?

सोनू सूद:भाजपचा एजंट??

महाराष्ट्र बचाओ आंदोलन