तबलिघी विचारसरणीच्या माध्यमातून फोफावणारी धार्मिक कट्टरता

दिनांक-२६/०४/२०२० रोजी प्रकाशित,

वर्षांनुवर्षे जगभरातील मुसलमान तबलिघी विचारसरणीच्या माध्यमातून धार्मिक कट्टरतेचे अनुसरण आणि उदात्तीकरणच करत आलेले आहेत,

इस्लामी शिकवण काय सांगते?

की जगातील प्रत्येक व्यक्तीने अल्लाहला मानले पाहिजे, त्याचे वर्चस्व स्वीकारले पाहिजे मग त्यासाठी इस्लामी शासकांनी तलवारीच्या टोकावर इस्लामचा प्रचार सुरू केला आणि त्यात जवळपास संपूर्ण जग भरडून निघाले.

भारतीय आणि जगाच्या संदर्भात इस्लाम ची प्रतिमा, स्वरूप आणि आक्रमक राजकारण हे नेहमीच चर्चेचे, कुतुहलाचे आणि संदेहाचे विषय राहिले आहेत. सुमारे 1400 वर्षांपूर्वी अरबस्तानात उदयास आलेल्या या नवीन पंथाच्या आक्रमक, साम्राज्य विस्तारवादी आणि धर्मप्रसारवादी धोरणाचा फटका जगातील अनेक संस्कृतिंना बसला. इराण, स्पेन, इराक, इजिप्त आदी देशांचे इस्लाममुळे सांस्कृतिक, धार्मिक आणि कट्टरवादी राष्ट्रात रूपांतर झाले हा इतिहास आहे. इस्लाममधील जिहाद, काफीर इत्यादी कल्पना भोवती एक गूढतेचे वलय गुंफले गेले आहे. त्यातच अलीकडे बोकाळलेल्या जिहादी दहशतवादाने आणि मुख्यत्वे अमेरीकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याने संपूर्ण जगाचे लक्ष इस्लामने वेधले होते.

इस्लाममध्ये दोन अवधारणांचा मागोवा सापडतो. एक विचारधारा इस्लाम हा शांतीचा, प्रेमाचा, बंधुत्वाचा संदेश देणारा विचार आहे असे मानते तर या उलट इस्लाम म्हणजे परमेश्वराप्रत नेणारा एकमेव मार्ग आहे, त्यामुळे सर्व मानव समाजाला इस्लामच्या पंथात आणणे आवश्यक आहे, असा टोकाचा असहिष्णु विचार करणाऱ्यांनी जगाची विभागणी दारूल इस्लाम आणि दारूल हरब अशा दोन भागात केली आहे आणि दारुल हरब चे रूपांतर दारूल इस्लाममध्ये कसे व किती लवकर करता येईल याचा विचार व त्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न व मार्ग अवलंबिण्यात येतात.
तलवारीच्या जोरावर इस्लामचा प्रचार व प्रसार अनेक देशात झाला हा इतिहास सर्वांना माहिती आहे. एके काळी अरब आणि तुर्की साम्राज्यांचा मोठा दबदबा होता पण नंतर मात्र इस्लामी जगात अनेक राष्ट्रे उदयास आली. राष्ट्रवाद, समाजवाद आणि मार्क्सवादाचा प्रभाव इस्लामवर पडला आणि अलीकडे दहशतवादाच्या विळख्यात इस्लामचे तत्वज्ञान सापडले आहे. 1928 मध्ये मुस्लिम ब्रदरहूड या दहशतवादी संघटनेची स्थापना झाली तेव्हापासून तो सध्याच्या तालीबान आणि अल-कायदापर्यंत हा इस्लामी दहशतवादाचा प्रभाव आणि परिणाम सारे जग भोगते आहे.

गझवा-ए -हिंद च्या नावाखाली संपूर्ण हिंदुस्थानात असलेल्या मंदिरांना नष्ट करून मूर्तिपूजा संपवून तिथे इस्लामचे राज्य स्थापन करून अल्लाह हाच केवळ सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध करणे ही देखील इस्लामी वर्चस्ववादाचे आणि धार्मिक कट्टरतेचे एक प्रतिकच आहे.

अर्थात हे दिवास्वप्न कधीच पूर्ण होणार नाही परंतु यामागे असलेला इस्लामी कट्टरतेचा कुटील डाव आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. लव्ह जिहाद हे देखील याच प्रसाराच्या प्रकारांत मोडणारी गोष्ट आहे.

नुकतंच ताज असलेलं तब्लिघी जमातीचे उदाहरण देखील आपल्या समोर आहे.

जगाच्या पृष्ठभागावर चालणारी ही एक सुन्नी इस्लामिक प्रचार चळवळ आहे, जी मुस्लिमांना मूलभूत इस्लामिक पद्धतींकडे सांगते.विशेषतः धार्मिक पद्धती, वस्त्रोद्योग, वैयक्तिक चळवळीच्या पद्धती.तब्लीगी हा जमातचा जन्म आहे. ही चळवळ 1926-227 दरम्यान भारतात सुरू झाली. या चळवळीचा पाया मौलाना मुहम्मद इलियास यांनी घातला. परंपरेनुसार, मौलाना मुहम्मद इलियास यांनी दिल्लीला लागून असलेल्या मेवात येथे लोकांना धार्मिक शिक्षण देऊन आपले काम सुरू केले,आज विचारांची लोकसंख्या जवळपास दीड कोटीहुन अधिक आहे, आणि ही चळवळ जगभरातील जवळपास सर्वच देशात कार्यरत आहे, तब्लिघी विचारसरणी ही कट्टरवादी प्रवृत्तीकडे झुकते आणि यांचे अल् कायदा आणि लष्कर-ए-तोयब्बा सारख्या दहशतवादी संघटनेसोबत असलेले संबंध यामुळे इतरधर्मीय लोकांच्या या चळवळी विषयी शंका येणे साहजिकच आहे.

मुख्यते अशा चळवळींमुळे येथील कट्टरपंथी मुस्लिमांचे जास्त फावते,

आपल्याकडील काँग्रेस आणि तथाकित सेक्युलर पक्षांनी देखील केवळ मतांच्या राजकारणासाठी अशा मुस्लिम समाजाचे नेहमीच लांगूलचालन केले, १९४७ नंतर मुस्लिमांना या पक्षांनी कधी विस्तृतपणे विचार करण्याची संधीच दिली नाही,सतत संघ, भाजप कट्टर हिंदू लोकांपासून तुम्हा लोकांना धोका आहे आणि आम्हाला जर मतदान केले नाही तरी तुमचे काही खरे नाही या खोट्या धोक्यात ठेवले २०१४ साली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तर याची पार हद्द ओलांडली गेली मोदी जर निवडून आले तर अख्ख्या मुसलमान समाज होरपळून निघेल अशा वावड्या उठवण्यात आल्या त्यात काही तथ्य नव्हतेच हे भविष्यात सिध्द झालेच पण मुस्लिमांना अंधारात ठेवणे हे यांनी नित्यपणाने प्रामाणिक पद्धतीने केले.

याचे उदाहरण म्हणजे शहाबानो प्रकरण,

शहाबानोच्या मागे शक्ति उभी करण्याऐवजी तिच्या विरोधातील शक्तिंचे हात घटनादुरुस्ती करून मजबूत केले. तस्लिमा नसरीनला आपण येऊ दिले पण कायम गॅसवर ठेवले. तिची वणवण थांबली की नाही कोण जाणे. हमीद दलवाई या त्यांच्यामधिल अतिशय तडफदार अशा समाजसुधारक देशभक्ताला व त्यांच्यानंतर त्यांचे काम चालू ठेवणार्‍या सय्यदभाईंना का नाही राज्यसभेत नियुक्त केले गेले?

असो, उत्तराला जास्त न लांबवता आटोपते घेताना एवढेच नमूद करू इच्छितो,

ज्यावेळेस हिंदुस्थानात मुस्लिमांचे धर्माच्या प्रसारासाठी प्रथम आक्रमण झाले तेव्हा त्यांनी पश्चिमेकडे आपल्या धार्मिक प्रसारामध्ये प्रचंड यश मिळवले होते आणि तेच यश मिळवण्यासाठी त्यांना आपल्याकडील अठरा पगड जातींतील विखुरलेला हिंदू धर्म कमालीचा फायद्याचा ठरला आणि आता ही कट्टरता रोखायची असेल तर आपण जात-पात या फंदात न पडता हिंदू म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे तरच हे कुठे रोखले जाऊ शकते.

-ऋषी भूमकर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय,औरंगाबाद

Comments

Popular posts from this blog

उद्धव ठाकरे एक आदर्शवादी मुख्यमंत्री?

सोनू सूद:भाजपचा एजंट??

महाराष्ट्र बचाओ आंदोलन