शरद पवार आणि हुलकावणी देणारं पंतप्रधान पद...
दिनांक-२५/०४/२०२० रोजी प्रकाशित,
शरद पवार
कोण आहेत हे शरद पवार?
महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील हुशार राजकीय व्यक्तिमत्व….
वेळोवेळी राजकारण करून सत्तेच्या चाव्या आपल्याच हातात कशा राहतील,आपलाच कसा फायदा होईल याची पुरेपूर जाण असणारा नेहमी राजकीय महत्वकांक्षा बाळगणारा नेता.
जातीयतेढ निर्माण करताना नैतिकतेच्या मर्यादा खुबीने ओलांडणारा, वारंवार विशिष्ठ शांतिप्रिय समाजाचे लांगुलचालन करून आपले राजकीय हेतू साध्य करणारा,
रामायण,महाभारत थोतांड आहे मात्र कुराणात सांगितलेलं अक्षर अन् अक्षर खरं आहे अशी विधाने करणारा,
आपल्या वयाच्या अर्ध्याहून लहान असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या माणसावर केवळ त्याची जात पाहून टीका करणारा,गरज नसताना त्यांची जात काढणारा, अनावश्यक पुणेरी पगडी-फुले पागोटा यांच्यावर विधान करणारा,१९९३साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात स्वतः १३ बॉम्बस्फोट शांतिप्रिय समाजाच्या वस्तीत झाला असे खोटे बोलून स्वहित साधणाऱ्या संधीसाधू स्वभावाचा हा नेता.
मराठा आरक्षण स्वतः १५ वर्ष सलग सत्तेत असून झुलवत ठेवणारे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ते आरक्षण दिले की यांचा स्वतः तिळपापड झाला.
माझं काही जमलं नाही, पण मी तुझंही जमु दिलं नाही’ ही तद्दन मराठी खेकडावृत्तीच जर राजकारण्यांच्या यशस्वीतेचं मोजमाप करण्याचं एकक असेल तर होय, पवार जिंकतात. मुळात त्यांच्या या पायात पाय घालुन पाडायच्या छंदामुळेच ते कधी खरे नेते होऊ शकले नाहीत.
आपल्या राजकीय आयुष्यात शरद पवारांनी नेहमी वादग्रस्त विधाने करून स्वतःची दुतोंडी गांडूळ अशी प्रतिमा तयार केली वारंवार याला धोका दे, त्याच्या पाठीत खंजीर खुपस,वेगळाच पक्ष काढ, पुन्हा जुन्या पक्षात ये-जा चालू ठेव यामुळे यामुळे देशाच्या राजकारणात शरद पवार हे नाव कायमचे अविश्वासास पात्र ठरले आहे.
राज्यातील सत्तेत इतके वर्ष असताना केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील ठराविक भागांचाच विकास शरद पवारांनी केला, बाकी मराठवाडा, विदर्भ वाऱ्यावर सोडला त्यामुळे विकास पुरुष अशी प्रतिमा त्यांची कधीच होऊ शकली नाही
सरतेशेवटी इतकंच सांगेल की,
पवारांची विकासापेक्षा जिरवा-जिरवीच्या राजकारणाकडेच त्यांची ओढ अधिक राहिली आणि तीच त्यांना भोवलीसुद्धा. महाराष्ट्राच्या राजकारणात जातीय समीकरणं नवी नाहीत, पण ती समीकरणं विषारी झाली ती शरद पवारांमुळेच. पवारांचे फायद्याचे मुल्य कमी आणि उपद्रव मुल्य जास्त आहे.
जोपर्यंत या जगात एकनिष्ठता,प्रामाणिकता,तत्वनिष्ठा,राष्ट्रप्रेम या गोष्टी अस्तित्वात आहेत. तोपर्यंत तुम्ही कितीही शरद पवार असलात तरी पंतप्रधानपद हे कायम तुम्हाला हुलकावणी देणारच….
-ऋषी भूमकर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय,औरंगाबाद
Comments
Post a Comment